न्यूज जालना बातमीचा दणका;बघा हा झाला परीणाम
कुंभार पिंपळगाव:येथील महावितरण रोहित्राला विळखा पडल्याबाबतचे वृत्त ‘न्यूज जालना’ने प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी महावितरणच्या कर्मचाऱ्याकडून या रोहित्रावरील वेली काढण्यात आल्या आहेत.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महावितरणचे एक रोहित्र वेलींच्या विळख्यात अडकले होते.याबाबत ‘न्यूज जालना’ च्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.याची दखल घेत दि.१५ शुक्रवार रोजी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून रोहित्राची वेलींच्या विळख्यातून मुक्तता केली आहे.
कुंभार पिंपळगाव येथील सरस्वती भुवन शाळा जवळील मुख्य रस्त्यावर गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र आहे.पावसाळ्यात या रोहित्राला चारही बाजूंनी झाडाझुडपासंह वेलींनी वेढा मारला होता.किरकोळ दुरूस्तीसाठी वीज कर्मचाऱ्यांना रोहित्राजवळ जाणे शक्य नव्हते.झाडाझुडपांच्या विळख्यात रोहित्र सापडले होते.याबाबत ‘न्यूज जालना’च्या अंकात वृत्त प्रसिद्ध करताच रोहित्राच्या परीसरात दि.15 शुक्रवार रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.