धामणगाव येथील युवकाला सापांच्या जोडप्याशी खेळणे पडले महागात, सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
धामणगाव येथील युवकाचा सर्पदंशाने मृत्यु, सापाच्या जोडप्याशी खेळणं पडलं महागात
(रवी लोखंडे /पारध )भोकरदन तालुक्यातील पारध येथून जवळच असलेल्या धामणगांव धाड जि.बुलडाणा जिल्हयातील राजू वसंता महाले (वय २२) या युवकाचा विषारी सापाशी खेळण्याच्या मोहापायी सर्पदंशा मुळे त्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. प्राप्त माहिती नुसार राजु नामक युवकाच्या राहत्या घरा समोर मासरुळ रोडवर रात्री १० वाजेच्या सुमारास मण्यार जातीच्या नर व मादीचा प्रणयक्रीडा सुरु असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. उपस्थित नागरिका मधील राजु नामक युवकाने सापांना पकडण्याचे विचित्र धाडस केले. परंतु साप पकडण्याच्या प्रयत्नात सापांनी सदर युवकास चार ठिकाणी चावा घेतल्यामुळे सापाचे विश पूर्ण शरीरात भिनले. उपस्थित नागरिकांनी राजुला दवाखान्यात दाखल
केले असता, उपचारा दरम्यान सकाळी युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. राजुने सापांना पकडण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नसल्याची माहिती समोर आली. तसेच घडलेल्या प्रकारा बाबत धाड येथील सर्पमित्र निलेश गुजर यांचेशी संपर्क साधला असता, निलेशने सापाशी संबंधित राबविलेल्या जनजागृती मोहिमे अंतर्गत सर्पतज्ञांशी वेळोवेळी चर्चा करून व शास्त्रशुध्द माहिती संकलित करून माहितीपर पुस्तिका नागरिकांना वाटप केल्या व परिसरात साप निघाल्यास अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे वेळोवेळी आवाहन करण्याचे कार्य सुध्दा त्यांनी आजतागायत केले आहे.
परंतु, बर्याच वेळेस युवक कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसतांना विषारी जातीच्या सापांना पकडण्याचे वेडे धाडस करतात व आपला जीव गमावतात. अप्रशिक्षित युवकांमुळे सापांना सुध्दा बऱ्याच वेळेस हानी पोहचते. त्या निमित्ताने नागरिकां मध्ये अधिक जनजागृती होणे व अधिकृत सर्पमित्रांनाच साप पकडण्यासाठी आमंत्रित करण्याचे आवाहन सर्पमित्र निलेश गुजर यांनी केले.
फोटो ओळी :-मन्यार जातीच्या जोडप्याशी खेळण्याचा प्रयत्न करतांना धामणगाव येथील )