घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव परीसरात विजेचा लपंडाव
वीज पुरवठा सुरळीत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परीसरातील गावात वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार नित्याचेच बनले आहे.सध्या सणासुदीच्या दिवसात वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण उपकेंद्राच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सध्या सणासुदीच्या दिवसात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत.असे असतानाही कुंभार पिंपळगाव व परीसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.पाऊस नसतानाही अर्धा एक-एक तास वीज गुल होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरीष्ठाने याकडे लक्ष देउन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.