लिंबी येथे विजेच्या घर्षणामुळे इतका ऊस जळाला
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील लिंबी शिवारातील शेतकरी कल्याण धनवे,ज्ञानेश्वर धनवे,संजीवनी वाघमारे यांच्या शेतातील गट नंबर 85,86,87 मधील यांच्या शेतातून जाणाऱ्या मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट होऊन 3 हेक्टर 60 आर क्षेत्रावरील उसाने अचानक पेट घेतला आहे.लिंबी शिवारातील कल्याण धनवे,ज्ञानेश्वर धनवे,संजीवनी वाघमारे या शेतकऱ्यांच्या नऊ एकरावरील उसाच्या पिकांत बुधवार दि.(27) दुपारी आग लागली आहे.घटनेची माहिती मिळताच येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रदीप कांबळे यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.संबंधित शेतकरी यांच्या शेतातून मुख्य वीज वाहीनी गेलेली आहे.या वाहीनीच्या जीर्ण तारा लोंबकळलेल्या आहेत.यामुळे ऊस जळून खाक झाला आहे.दरम्यान,परीसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.परंतु आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.