जालना जिल्हापरतूर तालुका

श्रीष्टी गावाजवळील भीषण अपघातात मातेसह दोन चिमुकली जागीच ठार,तर अनेक प्रवासी गंभीर जखमी

images (60)
images (60)

परतुर/प्रतिनिधी

कार आणि अपेरिक्षा वाहनांचा अपघात होऊन त्यात मातेसह दोन चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना आज (दि २८) गुरूवार रोजी घडली.मंठा येथील एक महिला आपल्या तीन मुलांना घेवून माहेरी गेली होती. आज माहेराहून मंठाकडे परतण्यासाठी अपेरिक्षा क्र.एम.एच.२१ AB १०३८ परतुर कडे निघाली होती.परतुर-आष्टी रस्त्यावरील श्रीष्टी पाटीजवळ समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्र.एम.एच.१२ NB ०२१९ या वाहनांचा भीषण अपघात झाला.या अपघातात अपेरिक्षामधील महिला व तीन चिमुकली मुली जागीच ठार झाले. तर कार चालक,रिक्षाचालक, व काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटनेच्या ठिकाणी परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे,पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!