घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश कोकणे,तर उपाध्यक्षपदी सरला कोकणे यांची निवड

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील जिल्हा परीषद प्रशालेत पालक सभेचे आयोजन करून शालेय व्यवस्थापन समिती आज (दि.२९) शुक्रवार रोजी समिती गठीत करण्यात आली.हि निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी अध्यक्षपदी महेश गोरखनाथ कोकणे,उपाध्यक्ष सौ सरला देवेंद्र कोकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर सदस्य पदी विलास घुमरे,अशोक कोकाटे,साधू लोंढे,सुधाकर कदम,खंडू काकडे,जयश्री बोडखे,ज्योती शिंदे, सरस्वती गुंजाळ, रेणुका थोरात,सविता डिगे,यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश उबाळे, सहशिक्षक मल्लेशे उद्धवराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!