उद्यापासून कुंभार पिंपळगावात अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पाहुणा मारोती मंदिरात ६ नोव्हेंबरपासुन भव्य अखंड हरीनाम सप्ताहाला सुरूवात होणार आहे.या सप्ताहात सात दिवस नामांकित किर्तनकारांचे किर्तन होणार आहेत.हरीनाम सप्ताहात पहाटे काकडा आरती,विष्णुसहस्रनाम,ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,प्रवचन,हरीपाठ,हरीकिर्तन,हरीजागर होणार आहे.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गुंड,ह.भ.प.गजानन महाराज सोळंके,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे,ह.भ.प.निव्रती महाराज देशमुख इंदोरीकर,ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर,ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर,ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे हरीकिर्तन होणार आहे.दि.१३ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होणार आहे.या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी किर्तन श्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.