मानवी सुख प्राप्तीसाठी सत्याच्या मार्गाने चालावे-ह.भ.प.रामेश्वर महाराज गुंड
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
भगवतांने मानव देह देवून या सजीव सृष्टीत मानसाला जन्माला घातले आहे.परंतु मानवी जीवन जगत असताना रस्ता खडतर असला तरी सत्याच्याच मार्गाने चालावे कारण हा मार्ग सुखाकडे व यशाकडे घेवून जात असल्याचे मत ह.भ.प.रामेश्वर महाराज गुंड यांनी व्यक्त केले.ते आज कुंभार पिंपळगाव येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात पहिल्या दिवशीच्या किर्तन सेवेत पुष्प गुंफताना संत शिरोमणी एकनाथ महाराज यांच्या अभंगातील
आधी अवतने संताचे! जेवन जेवू हरीनामाचे!आम्ही जेविलो जेविलो!नामाम्रत कोण झालो!परवी पडवी हरीनामाची!आवडी पुरवी जिवीची! आम्ही जेविलो जेविलो!नामाम्रत कोण झालो! नामा केशवाचा म्हणे !माझ्या ह्दयी नारायण! आम्ही जेविलो जेविलो!नामाम्रत कोण झालो! संत एकनाथ महाराज यांच्या या चार चरणाच्या अभंगावर निरूपण केले.प्रत्येकांनी परमार्थ करावे परमार्थ केल्याने मोक्ष मिळत असतो.संगत करायची असेल तर संताची करा संताची संगतीने जीवनाचा मार्ग सुलभ होतो.यश निश्चित मिळते.दुर्जनांचा संगतीने माणूस दुर्जन बनतो.जीवनात आयुष्य जगत असताना सत्कर्म करावे.कुणाविषयही वाईट विचार करू नये.जीवनात पैसा भरपूर कमवा परंतु पैसाची योग्य विल्हेवाट लावणे याला अधिक महत्त्व असल्याचे म्हणाले.निष्काम कार्य केल्याने माणूस मोठा होतो.अहंकार आणि अभिमान यातील फरक प्रत्येकाला समजणेचे गरजेचे आहे.असे ह.भ.प.रामेश्वर महाराज गुंड म्हणाले.आज दिपावलीचा सहाव्या दिवशीचा सण म्हणजे भाऊबीजाचा सण असून बहीण आणि भाऊ नाती जपणे हीच खरी नैतिकता असल्याचे महाराजांनी सांगितले.यावेळी किर्तन श्रवणासाठी परीसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.