घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील ह्या गावात सापडले दोन अजगर?

घनसावंगी / प्रतिनिधी

images (60)
images (60)

तालुक्यातील राहेरा येथील तलावात मासे धरण्यासाठी लावलेल्या जाळी मध्ये अडकलेल्या दोन अजगर साप त्यातील एक अजगर हा लांबी दहा-बारा फूट व दुसरा अजगर लांबी आठ-दहा फूट एवढे मोठे दोन अजगर एकाच जागी असल्याची माहिती स्थानिक शेतकरी मंगेश वाघमारे यांनी दिली व संतोष शिंदे यांनी तालुक्यातील ढाकेफळ येथील सर्पमित्र दीपक चांदर यांना तात्काळ माहिती देऊन त्यांना त्या ठिकाणी पाचारण केले.
सर्पमित्र दीपक चांदर यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित राहेरा येथील तलावाजवळ पोहोचून अवघ्या काही वेळात दोन अजगराना पकडले.
अत्यंत दुर्मिळ अजगर जाती चे दोन अजगर लांबी दहा-बारा फूट व दुसरा अजगर लांबी आठ-दहा फूट लांब अजगर जिवंत पकडले सर्प मित्र दीपक चांदर यांनी त्या दोन्ही आजगरांना सुरक्षित जंगल क्षेत्रात सोडून जीवनदान दिले आहे.


सर्पमित्र दीपक चांदर म्हणाले की,आपली परिसरात प्रथमच एवढे मोठे अजगर साप आढळून आले असून त्यांच्या पासून कोणाला मानव व अन्य जनावरांना धोका होऊ नये हा हेतू समोर ठेऊन अजगराना जंगल क्षेत्रात सोडण्यात आले आहे.


घनसावंगी परिसरात कुठेही अजगर किंवा अन्य जातीचे साप आढळून आल्यास 9049885901 या मोबाईल क्रमांवर कॉल करावा मी सर्पमित्र या नात्याने सतत जनतेच्या असेल व आपणही साप किंवा वन्य जीव न मारता त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यास मदत करावी व वन्य जीव वाचवावे असे आव्हान केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!