देविदहेगाव येथील समृद्धी कारखान्याचा गळीत हंगाम संपन्न

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील देविदहेगाव येथील समृद्धी कारखान्याचा सन २०२१-२०२२ यावर्षीचा ११ वा गळीत हंगामाचा शुभारंभ आज (दि.७ )रविवार रोजी कारखान्याचे चेअरमन सतिषराव घाटगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन महेंद्र मेठी यांची प्रमुख उपस्थिती होती.कारखान्याचे संचालक दिलीपराव फलके यांच्याहस्ते गव्हाण पुजा करण्यात आली.
यावेळी सतिष घाटगे म्हणाले की,समृद्धी कारखान्याच्या सभासदाकडे साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून कारखान्याचे साडेपाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट असल्याचे सांगितले.तर उर्वरित एक लाख मेट्रिक टन गाळपासाठी इतर कारखान्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.कारखान्याच्या सभासदांनी निश्चित राहावे त्यांचा पूर्ण ऊस गाळप केला जाईल.वेळ प्रसंगी कारखाना पाऊस पडेपर्यंत सुरू ठेवण्यात येईल. असे शेवटी म्हणाले.यावेळी कारखान्याचे संचालक दिलीपराव फलके अभिजीतराव उढाण, विकास राजकुमार शिंदे, माथूनकर,शेतकीय अधिकारी अमोल तौर, प्रदीप घाटगे,डे.चीप.ई.सींग,डे.चीप.केमिस्ट माथूर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, तोड वाहतूक, ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.