घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगी तालुक्यातील ह्या गावात एकदिवसीय सत्संग मेळावा
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील तीर्थक्षेत्र जांबसमर्थ येथील संत रामदास स्वामी मंदिरात (दि.९) मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रशासकीय दौरा व सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संग मेळाव्याला परमपूज्य गुरूमाऊली यांचे परमश्रद्धेय तथा सुपुत्र चंद्रकांतदादा मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात जिवनाशी संबंधित शेती शास्त्र, आर्युर्वेद विवाह,संस्कार, बालसंस्कार, मराठी,अस्मिता भारतीय संस्कृती,स्वंयरोजगार,अशा महत्वपूर्ण विविध विषयांंवर हितगुज साधणार आहेत.या एकदिवसीय सत्संग मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.