घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जळुन खाक;लाखो रूपयांचे नुकसान
कुंभारपिंपळगाव:येथील शेतकरी शामसुंदर वसंतराव उढाण यांच्या तीन एकर उसाला आग लागली होती.या आगीत ऊस जळून खाक झाला.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील गट नंबर 333 शिवारातील विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊसाला आग लागल्याची घटना (दि.9) मंगळवारी रोजी दुपारी घडली.या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान परीसरातील ग्रामस्थांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.परंतु आगीचा भडका उडत असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही.कुंभार पिंपळगावसह परीसरातील महाविरणच्या तारा जीर्ण व धोकादायक बनलेल्या आहेत. यामुळे ऊस जळण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याकडे महावितरणच्या वरीष्ठांने लक्ष देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी श्यामसुंदर वसंतराव उढाण यांनी केली आहे.