तरूणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका-ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
तरूणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका,व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.आई वडीलांची सेवा करा असे समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी सांगितले.ते घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात बोलत होते.मंगळवारी सायंकाळी ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांचे किर्तन पार पडले.या किर्तनास परीसरातील भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी पुढे बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की,तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून अनेकांचे संसार दारूमुळे उद्धवस्त झालेली आहेत.मुलांचे संस्कार चांगले घडवा संस्कार चांगले घडले तर धर्म टिकून राहील.तरूण युवक नोकरी नसल्याने बेरोजगार झाला आहे.या युगात संताचे नाव हॉटेल,ढाब्याला देऊन नावाचा दू्रूपयोग करीत असल्याचे महारांजांनी यावेळी सांगितले.वारकरी सांप्रदायांचा वारसा हा परंपरागत चालत आलेला असून तो आजतागायत अजरामर आहे.कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनात त्याग निर्माण करा.मोबाईलचा वापर योग्य ठिकाणी करा.मोबाइल मुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे.या जगात कुणी कुणाचे नसते.सख्या भाऊशी दुश्मनी करू नका. रक्ताची नाती जपून बहीण- भाऊ नाती सांभाळा. असा उपदेश महाराजांनी दिला.एकमेकांबद्दल मान- सन्मान ठेवा.मोबाईलमुळे तरूण पिढी बिघडत असल्याचे महारांजांनी उपस्थितांना सांगितले.इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाला परीसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन…..महाराज झाले भावूक……!
ह.भ.प.इंदोरीकर महाराज किर्तनाच्या सुरूवातीलाच सर्वांना मोबाईल बंद करून ठेवण्याची विनवणी केली.रात्रंदिवस सत्य परीस्थितीच्या आधारावर समाजप्रबोधन करीत महाराष्ट्रभर फिरत असुन अपशब्दाचा वापर करून या युट्युब व शोशल मिडीयामुळे माझी बदनामी झालेली आहे.याचा मला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली.त्यामुळेच मोबाईल वापरत नसल्याचे महाराजांनी सांगितले.