कोरोना लसीकरणसाठी आता नवीन नियम हे दिले जिल्हाधिकारी यांनी आदेश
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी
जालना दि. 11 :- शासनाने संपुर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्याटप्याने कमी कमी केलेले असून संभाव्य तिस-या लाटेची शक्यता विचारात घेता जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण होण अपेक्षित असुन मुख्य सचिव यांनी दिलेल्या सुचनेनुसार सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व औद्योगीक आस्थानामध्ये कोव्हिड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. विजय राठोड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सुचना-जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोव्हिड -19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचा-यांकडुन प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचा-यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरणे केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरणे पुर्ण होईल याची खातरजमा करावी.ज्या गावात, वॉर्डात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी , गट विकास अधिकारी, मुख्यधिकारी नगर पालिका, यांनी मुख्यत्वाने लसीकरण सत्र आयोजित करावे व लाभार्थ्यांचे लसीकरण करावे व लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करुन त्यादृष्टीने कार्यवाही करावी.सर्व प्रकारचे दुकाने, आस्थापनातील हॉटेल इत्यादी मालक व कामगार, कर्मचारी यांच्या लसीकरणाची किमान एक मात्रा डोस पुर्ण झालेल्या असतील तीच दुकाने, आस्थापना यापुढे खुली करण्यास मुभा राहील. अन्यथा स्थानिक प्राधिकरणाने ही दुकाने, आस्थापना, हॉटेल बंद करावी.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, अनुदानित संस्था, विना अनुदानित संस्था व खाजगी आस्थापनांमध्ये कामकाजास्तव येणा-या सर्व अभ्यागतांना लीसकरणाची किमान एम मात्रा झालेली नसल्यास, त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.याबाबत नो व्हॅक्सिन नो एन्ट्री हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणी, क्लासेस इत्यादी संस्थांमध्ये लसीकरणाची किमान एक मात्रा पुर्ण झालेल्या विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, कर्मचारी व अभ्यागतांनाच संस्थेच्या इमारतीत अथवा आवारात प्रवेश राहील. सर्व सुचनांचे पालन करुन सर्व कोव्हिड -19 प्रतिबंधात्मक बाबींचे संबंधी सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था प्रमुख यांची असेल. याचे उल्लंघन निदर्शनास आल्यास, अशा संस्था या बाबींच्या पुर्ततेपर्यंत सील करण्यात येतील.
नो व्हॅक्सिन नो ट्रव्हल इन बस यानुसार आंतरजिल्ह्यात व आंतरराज्य बसने, खाजगी प्रवासी वाहनाने प्रवास करण्यासाठी देखील लसीकरणासाठी किमान 1 मात्रा पुर्ण झालेली असणे बंधनकारक राहील.
विशेष सुचना- लोकजागृतीतुन लसीकरण मोहिम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण प्रथम मात्रा झाले पाहिजे लसीकरणाचा दुसरा डोस कोव्हिडशिल्ड 84 दिवस व कोव्हॅक्सीन 28 दिवसांनी घेणे अनिवार्य आहे.या आदेशाची कोणतीही व्यक्ती, किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील असेही आदेशान नमुद करण्यात आले आहे.