मनुष्य देहात देवाचे नामस्मरण करा-ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
मानव देहाला जगण्यासाठी अल्प आयुष्य मिळालेला आहे.त्यामुळे सतत देवाचे नामस्मरण करावे असे प्रतिपादन ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर यांनी केले.
ते कुंभार पिंपळगाव येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशीच्या किर्तन सेवेत बोलत होते.वैकुंठवाशी,जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पाच चरणाच्या अभंगावर निरूपण करताना महाराज म्हणाले की,मानव जन्माला अल्प आयुष्य मिळालेला असून सदैव देवाचे नामस्मरण करावे.नामस्मरण केल्यास देव आपल्याघरी धावून येतील.त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागावे.तारूण्यपणात चांगले काम केले तर म्हतारपण सुखात जातील.या जगात सुखी कोणी नाही सर्वजण दु:खी आहेत. संसारात पण सुख नाही.जगात दोनच जण सुखी असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले.एक परमार्थ आणि दुसरा भगवंत.किर्तनातून माणुस घडत असतो.प्राणी आडवा असुन कोणाच्याच आडवा येत नाहीत. माणूस मात्र सरळ असुन चांगल्या कामात आडवा येत असल्याचे महाराजांनी सांगितले.कोरोनाने जगावे कसे हे शिकविले.तर कोरोनामुळे एकमेकांची नाती दुरावली गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्य स्थिती लक्षात घेता सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील महाराजांनी किर्तनातून केले.कोरोनामुळे समाजात माणुसकी मिळाली आहे.या मानवी देहाचा भरावसा नसुन कोणता दिवस कसा येईल हे सांगता येत नाहीत.त्यामुळे मिळालेल्या आयुष्यात देवांचे नामस्मरण करावे.आपल्यातीलच अधर्मी लोकांपासुन हिंदू धर्माला धोका निर्माण होत आहे. जीवनात असे जगावे की मागे किर्ती राहिले पाहिजे.आयुष्यात धन भरपूर कमवा पण धनाचा वापर चांगल्या धार्मिक कार्यात करा.धन कुबेराचा आहे आणि देह काळाचा आहे. प्रेम करा परंतु दर्जा बघून प्रेम करा.पण प्रेमाला मात्र कलंक लावू नका असे भोजेकर महाराज यांनी उपस्थितांना सांगितले. प्रेम करायचा असेल तर राष्ट्र,देश,धर्म,देवावर प्रेम करण्याचे महाराजांनी सांगितले.आई ही जगात सर्वश्रेष्ठ माता आहे.आपल्या लेकरांवर संसार घाला.संस्कार ही काळाची गरज आहे. जिजाऊंनी संस्कार शिकविले म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले.मुलींनी आपल्या आई-वडीलांची मान ताठ राहिली पाहिजे असे समाजात वागावे.आई वडीलांची सेवा करण्याचे उपदेश ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर यांनी शेवटी केले.या किर्तन श्रवणासाठी कुंभार पिंपळगावसह परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.