संपुर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात मंगळसूत्र चोराच्या मुसक्या आवळल्या
जालना न्यूज :-
मंगळसूत्र चोरीचे 10 गुन्हे उघडकीस
साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शहरात पेट्रोलींग करीत असतांना नुतन वसाहत भागातुन मोटारसायकलवर एक इसम संशयास्पद रित्या वावरताना आढळून आला होता. त्यास ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता, तो इसम हा कुख्यात मंगळसूत्र चोर असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीमध्ये त्यांने जालना शहरात मंगळसूत्र व सोन्याचचे दागिने लांबविण्याचे 10 सोन गुन्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुली दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक, श्री.दुर्गेश राजपुत, प्रमोद बोंडले, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, दत्तात्रय वांघुडे, फुलचंद गव्हाणे, सुधिर वाघमारे, रुस्तुम जैवाळ, मदन बहुरे, देविदास भोजणे, योगेश सहाने, कैलास चेके, सचिन राऊत, संजय राऊत, सुरज साठे, चंद्रकला शेडमल्लु, गोदावरी सरोदे यांनी केली आहे.