दिवाळी अंक २०२१

घनसावंगी तालुक्यात नावलौकिक असलेला पाहुणा मारोती

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजारपेठेची लोकसंख्या झपाट्याने वाढत मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे.येथील बुधवारी भरणारा आठवडी बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.कुंभार पिंपळगावात नागोबाचे मंदिर, नरहरी मंदीर,खंडोबा मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर,तुळजाभवानी मंदिर,गोरोबाकाकांचे मंदिर,सेवालाल मंदिर,मारोतीचे मंदिर अशा प्रकारचे विविध देवी-देवतांचे मंदिर आहेत.येथील नवसाला पावणारा मंदिर म्हणजेच पाहुणा मारोती मंदीर होय.हे मंदिर ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो.घनसावंगी तालुक्यात नावलौकिक असलेला पाहुणा मारोती मंदिर असून परजिल्हातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.मंदिराच्या पूर्व दिशेला ओढा असून मुसळधार पाऊस पडल्याने त्या ओढ्याच्या महापूरात मुर्ती वाहत आली.आजू-बाजुच्या ग्रामस्थांनी मुर्तीला पाण्यात पाहीले.ग्रामस्थांनी मुर्ती पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.परंतु हि मुर्तीजागेवरून हलत नसल्याचे ग्रामस्थांचे लक्षात आले.मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा गावात बाहेरगावाहून वास्तव्यास आलेले शिवनारायण लोया यांच्या हस्ते करण्याचे ठरविले.शिवनारायण लोया यांनी अभिषेक करून भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला.ग्रामस्थांनी धार्मिक कार्यक्रम घेत भव्य दिव्य मंदिर उभारले आहे.याला जवळपास दीडशे हुन अधिक वर्षीचा कालावधी उलटून गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.याठिकाणी बोललेला नवस पुर्ण होत असल्याचे भाविक म्हणत आहेत.पाहुणा मारोतीची मुर्ती विशेष ओळख आहे.सर्वत्र मारोतीची मुर्ती एका हातात गदा व एका हातात पर्वत अशी आहे.परंतु कुंभार पिंपळगाव येथील मुर्ती एका हातात गदा व एका हाताने आर्शिवाद देत असल्याचे दिसून येते.अशी प्रकारच्या मुर्ती फक्त राजस्थानमध्ये आढळून येतात.त्यानंतर कुंभार पिंपळगावात अशी मारोतीरायाची मुर्ती आहे.या पाहुणा मारोतीची स्थापना सेलू येथून वास्तव्यास आलेले पाहुणा व्यापारी शिवनारायण लोया यांच्या हस्ते करून पुढे सेवा बद्रीनाथ लोया,बाबुसेठ लोया यांनी केली.महारूद्र मंदिराची देखरेख गुरव बंधूनी केली.दररोज सकाळी दैनंदिन आरती,चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.सलग तेवीस वर्षांपासून मंदिराच्या प्रागंणात अखंड हरीनाम सप्ताह होत असतो.या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत किर्तनकारांनी हजेरी लावलेली आहे.दिपावली पाडवा भाऊबीज अशा त्रिवेणी संगमावर यावर्षीचा अंखड हरीनाम सप्ताह सुरू आहे.

संकल्पना : कुलदीप पवार

प्रतिनिधी न्यूज जालना कुंभार पिंपळगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!