जालना शहरामध्ये सम व विषम पार्कींग व्यवस्था :जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कुलदीप पवार/प्रतिनिधी
जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी निर्गमित केले आदेश
जालना दि. 17- जालना शहरातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढत्या वाहनांमुळे पार्कींगची समस्या उद्भवत आहे. सदर मार्गावर येणा-या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या अस्तावस्त पार्कींगमुळे वाहतुक कोंडी होत आहे. तसेच नागरीकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जालना यांच्या सुचनेवरुन पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, जालना यांनी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी, नगरसेवक, नगरपरिषदेचे पदाधिकारी, सराफा असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करुन सर्वानुमते सदर महत्वाचे मार्ग, बाजरपेठेच्या ठिकाणी P 1,P 2 सम व विषम पार्कींग व्यवस्था करण्यासाठी ठिकाण निश्चित करुन त्यांनी सहमती दर्शविल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 (1951 चा अधिनियम क्र.22) चे कलम 33 (1) (क) व इतर प्राप्त अधिकारान्वये जालना शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी प्राप्त अधिकारान्वये सम-विषम तारखेस P 1,P 2 पार्कींग व्यवस्था लागु करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत._
सम व विषम पार्किंग व्यवस्था लागू केलेली ठिकाणे: मामा चौक ते टांगा स्टँण्ड (उडपी हॉटेल चौक), सुभाष चौक ते महावीर चौक, शनि मंदिर चौक ते गांधी चमन, काद्राबाद चौकी ते पाणीवेस या ठिकाणी सम व विषम पार्किंग व्यवस्था लागू करण्यात येणार असुन यामधुन शासकीय वाहने, अँम्बुलन्स, अग्नीशामक वाहने वगळण्यात आली असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
–––––––––