जालना क्राईम
घनसावंगी तालुक्यातील ह्या गावातून चोरट्यांनी सौरऊर्जेचे मोटारपंप लांबविले…! बघा कुठे घडली ही घटना….
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
भुरट्या चोरट्यांनी आपला चोरीचा मोर्चा आता शेताकडे वळविला आहे.दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.
घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी येथील शेतकरी लहू सिताराम चव्हाण यांनी त्यांच्या भेंडाळा शिवारातील शेतात बसविलेल्या सौरऊर्जेचे मोटार पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि.17 गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. शेतकरी लहू चव्हाण यांचे 36 हजार 630 रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरील घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे हे करीत आहेत.