घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे घनसावंगी तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न

कुलदीप पवार/प्रतिनिधी

images (60)
images (60)

घनसावंगी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तिसरे तालुका पक्ष अधिवेशन आज दिनांक 20 रविवार रोजी उत्साहात संपन्न झाले.
अधिवेशनाची सुरुवात झेंडा वंदन करून व शहीद स्मारकास अभिवादन करून करण्यात आली.या अधिवेशनाचे उदघाटन जेष्ठ नेते कॉम्रेड अण्णा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड मधुकर मोकळे,कॉम्रेड मारोती खंदारे यांची उपस्थिती होती.
अधिवेशनात मागील चार वर्षाचा कार्य अहवाल तालुका सेक्रेटरी कॉम्रेड गोविंद आर्दड यांनी मांडला. त्यावर चर्चा होऊन अहवालास एकमताने मंजुरी देण्यात आली.
या अधिवेशनात देशाच्या सार्वजनिक संपत्तीचे खाजगीकरण बंद करा, तीन कृषी काळे कायदे रद्द करा,कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा,योजना कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा,हमी भावाचा कायदा करा,मनरेंगावर प्रतिदिन 600 रुपये मजुरी द्या,असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा,अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा,जातीय व महिलांवरील अत्याचार करणार्यांवर कठोर कार्यवाही करा, वाढती बेरीजगरीवर आला घाला व शिक्षणाचे खाजगिकरन बंद झाले पाहिजे या विरुद्धचा लढा तीव्र करा इत्यादी ठराव एकमताने संमत करण्यात आले.
अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नवीन तालुका कमिटी निवडण्यात आली.
तालुका सेक्रेटरी म्हणून अजित पंडित,व तालुका कमिटी सदस्य गोविंद आर्दड, कल्पना आर्दड, सर्जेराव बरसाले,अंशीराम गणगे,अंकुशराव मोहिते, जनार्धन भोरे, कुलदीप आर्द्ड, नारायन मते, बलासाहेब राउत, अशोक रत्न पारखे, कुलदीप आर्द्ड यांची तालुका कमिटी वर् निवड काढण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील पक्षच प्रतिनिधी उपस्तीत होते.शेवटी लाल बावटे की जय,च्या घोषणा देत अधिवेशनाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!