सुंदरेश्वर सांस्कृतिक महोत्सवाची राज्यस्तरीय नृत्य व गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक येथे बालाजी यात्रेनिमित्त जि.प.प्रा.शाळेमध्ये राज्यस्तरीय खुली नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे अध्यक्ष हरिदास घुंगासे व प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शिवशाहीर अरविंद घोगरे ,सतीश नाटकर अभिनेता,उद्घाटक किशोर उढाण,बाबू काका आर्दड,परीक्षक प्रा.डॉ. कन्नूलाल विटोरे मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी
विशेष उपस्तिथी, रघुनाथ ताठे, भगवान भाऊ तौर, किसन भोईटे, दत्ता टरले,ज्ञानेश्वर जाधव आदींनी उपस्थित दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.समस्त ग्रामस्थ व आयुष्य अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी यात्रा(लळीत) निमित्त आयोजित करण्यात आले होते.
महोत्सवास आलेल्या प्रमुख अतिथींनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाचा शुभारंभ गायक आकाश खाडे, कार्तिक शिलवंत, हर्षद यादव यांच्या गणेश वंदनाने झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश काळे यांनी केले. तसेच हे महोत्सवाचे पहिलेच वर्ष होते. स्पर्धकांनी सुद्धा सहभाग दर्शवून कार्यक्रमाला एक वेगळीच दिशा दर्शवली.
शेवटी परीक्षकांनी दिलेलाच निकाल अंतिम निकाल म्हणून ठरविण्यात आला. तसेच कलाकार दत्ता टरले यांच्या विनोदाने या कार्यक्रम संपन्न झाला. तसेच नृत्य आणि गायना मधील पहिले तीन-तीन स्पर्धक निवडून त्यांना रोख रकमेचे बक्षीस, अवार्ड व प्रमाणपत्र परीक्षकांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्रही देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये आत्माराम जाधव,सुरेश रेडे,गोविंद गोरे, ज्ञानेश्वर खाडे,अभिषेक दुकानदार,अशोक हुंबे,ज्ञानेश्वर भोसले, प्रदिप धनवडे,आकाश खाडे,ऋषिकेश चिकणे व समस्त गावकरी मंडळी आदींच्या अनमोल सहकार्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.