स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुल शाळेतील लहान चिमुकल्यांनी घेतला निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आस्वाद !
कुंभार पिंपळगाव :कुलदीप पवार
“श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उण पडे’ या काव्यपंक्तीच्या उक्तिप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कुंभार पिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद शाळेची निसर्ग सहल आज दि.25 रोजी नेण्यात आली.सर्वत्र पसरलेल्या दाट हिरवाईने मुलांनी निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला.लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कविता, नाट्य, भारूड,एकांकिका, रेल गाडी,लपंडाव, गायन असे सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले.या सहलीत निसर्गरम्य वातावरणात लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांत नवचैतन्य पाहावयास मिळाले. मुलांनी खेळण्याचा मनशोक्त आनंद लुटला. या निसर्गरम्य वातावरणात मुलांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिक केले.यावेळी शाळेच्या शिक्षक व शिक्षकीने विद्यार्थ्यांना खेळाचे धडे शिकविले.नर्सरी, सिनियर, जुनिअर,या वर्गातील लहान चिमुकल्यांनी खेळण्याचे आनंद लूटले.सहली दरम्यान शिक्षिका अर्चना कंटुले,साधना गायकवाड, ऐश्वर्या लकडे,सोनाली इंगळे,अनिता तांगडे,यांनी परिश्रम घेतले.