जालन्यात चोरीची दुचाकी विक्री करणारा सराईत गुन्हेगाराला अटक
चार दुचाकी व एक इंजिन असा 1 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त
जालना प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून जालना शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीची घटनेत दिवसेंदिवस होतांना दिसत आहे.संशयित आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत आहे. जालना शहरात दुचाकीची चोरी करून ऑटो गॅरेजच्या मित्रामार्फत सुट्टे भाग विक्री करणारा सराईत चोरटा शहरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती. सदरील माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात संशयास्पिदरित्या फिरणाऱ्या संतोष भास्कर जाधव (रा.पळसखेडा ता.भोकरदन ह.मु.जालना) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि.(28) रविवार रोजी जेरबंद केले आहे.पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखविताच संतोष जाधव यांनी आपण दुचाकीची चोरी करुन गावाकडील गॅरेजचालक संतोष पिंपळे (रा.पळसखेडा पिंपळे) यांच्या मदतीने विक्री केल्याची कबुली दिली.सदरील मोटारसायकल फायनान्स कंपनीने जप्त.केल्या असल्याचे सांगून त्यांची भोकरदन,जाफराबाद तालुक्यातील विविध गावामध्ये विक्री केलेली असून तसेच मोटारसायकल चे सुट्टे भाग विक्री केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस कर्मचारी कांबळे,जगदीश बावणे,तंगे,रूस्तुम जैवळ,सचिन चौधरी, यांनी पार पाडली.