जालना जिल्हाराजकारण

माझी नाहक बदनामी करण्यासाठीच खा.किरीट सोमय्या जालना दौऱ्यावर-माजीमंत्री खोतकर

images (60)
images (60)

कुलदीप पवार/प्रतिनिधी

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे माझी नाहक बदनामी करण्यासाठीच जालना जिल्हा दौऱ्यावर फिरत असल्याचे प्रखर टिका माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत बोलताना खोतकर म्हणाले की,केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष निमंत्रणाने खा.सोमय्या हे जालना जिल्हा दौऱ्यावर फिरत असून धन्याने दिलेले काम चोखपणे पाडायचे आणि केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा टिकविण्यासाठीच राज्यभर दौरे करीत फिरत असून त्यांचे आरोप हे हास्यास्पद असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना खोतकर म्हणाले की,दिपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती.मात्र,घोषणा करताच विरोधकांच्या पोटात गोळा येऊन कारखान्यात विघ्न आणण्याचे प्रयत्न केले.कारखान्याच्या कामाला सुरूवात केली होती परंतु काम अंतिम टप्प्यात असतानाच असे प्रकार सुरू असल्याचे खोतकर यांनी यावेळी सांगितले.माझी बदनामी करण्यासाठी खा.किरीट सोमय्या हे पत्रकार परीषद घेत असून हाच हेतू असल्याचे आरोप खोतकरांनी केले.आगामी लोकसभा निवडणुकाजवळ आल्याने माझ्याविषयी व माझ्यापक्षाविषयी लोकात संभ्रम निर्माण करून बदनामी करीत असल्याचे टिका खोतकर यांनी केली.भाजपने सुरूवात केलेली असून आम्ही त्यांचे शेवट करू यासाठी कदापि मागे हटणार नसल्याचे खोतकर म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!