अग्निशस्त्र, स्फोटक पदार्थ विनापरवाना जवळ बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक एक फरार
अग्निशस्त्र,स्फोटक पदार्थ विनपरवाना जवळ बाळगले, दोन जणांच्या मुसक्या पारध पोलिसांनी आवळाल्या एक फरार, पारध पोलीस ठाणे हद्दीतील वाढोणा येथील घटनाप्रतिनिधी (पारध )भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील गायरानावरा तीन जणं विनपरवाना अग्निशस्त्र व स्फोटक पदार्थ जवळबाळगणाऱ्या दोघांना सिनेस्टाईल जेरबंद केले तर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला.पारध पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आशी की, गुरुवारी एस. जी. जाधव हे ठाणे अंमलदार असताना एका गुप्तमाहीतीदाराने माहिती दिली की, मौजे वाढोणा ता. भोकरदन येथील इसम नामे कृष्णा समाधान तायडे आणि मेहेगाव ता. भोकरदन येथील सुनिल शामसिंग डांगर हे दोघे वाढोणा शिवारातील सरकारी गायरान (रमण्या )येथे त्यांच्याकडील बंदूक (ठासनीची )घेऊन फिरत आहे. या माहिती वरून तात्काळ स. पो. नि. अभिजीत मोरे, ठाणे अंमलदार संतोष जाधव आणि त्यांचे सहकारी खरात,रानगोते, जीवन भालके, सुरेश डुकरे यांनी गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घटनास्थळ गाठले असता त्याठिकाणी पोलिसांना बॅटरीचा उजेड दिसला. त्या उजेडाच्या दिशेने पोलीस लपून छपून सदर इसमापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना फायरिंग झाल्याचा आवाज आल्याने पोलीस पथक बाजूच्या शेतात दबा धरून या इसमांच्या हालचालीनंवर लक्ष ठेऊन होते. रात्री 9:55वाजता अचानक या इसमांवर छापा टाकून दोघांना जागीच पकडले मात्र एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी आपले नाव कृष्णा समाधान तायडे, रा. वाढोणा आणि सुनिल शामसिंग डांगर, रा. मेहगाव असल्याचे सांगितले आणि फरार झालेल्या आरोपीचे नाव सागर भीमसिंग धनावत, रा. मेहगाव असल्याचे इतर आरोपीनी सांगितले. त्यांच्याकडील शास्त्राची पोलिसांनी पहाणी केली असता त्यात 1)लाकडी दस्ता असलेली ठसानीची बंदूक 2)लहान मोठया आकाराचे काळ्या धातूचे 26छरे 3)लोखंडी धातूचे ठासनीचे बंदुकीच्या स्ट्रीगर सारखे 4)लोखंडी धातूचे वेटोळे असलेले तीन स्प्रिंग 5)लोखंडाचे एल आकाराचे लहान लहान तारेचे तुकडे 6)सिल्वर रंगाची जाणभल्या झाकणाची दारू असलेली बाटली आदी स्फोटक पदार्थ आणि अग्निशस्त्र विनापरवाना जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावरून वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात पारध पोलीस ठाण्याचे अंमलदार संतोष जाधव यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन शुक्रवारी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास स. पो. नि. अभिजीत मोरे हे करत आहे.