मुंबई दादर रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे मागणी
जालना/प्रतिनिधी
मुंबई दादर रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर व पदाधिकार्यांनी केली अहे.
याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पा. दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे वंचित घटक हा जनप्रवाहात आला. त्यांना जीवन जगण्याचे मुलभुत हक्क प्राप्त झाले. वंचित घटकास त्यांचे मुलभुत अधिकारासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा व शिक्षणाबाबत महत्व कळाले. संपुर्ण देशालाच एक शिस्त लावण्याबाबत महत्वाचे कार्य झाले. प्रत्येक व्यक्तीस त्यांचे मुलभुत अधिकार व कर्तव्य समजले. अशा महामानवाचा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाझ स्तुप चैत्यभुमी दादर मुंबई येथे आहे. ते दादर असल्याने 6 डिसेंबर या दिवशी त्यांना अभिवादन करण्याकरीता मुंबई दादर येथे अनेक अनुयायी येत असतात. या रेल्वे स्टेशनला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्याचे नामकरण करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
केेंद्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रमुख सिताराम गंगावणे, वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनिल गायकवाड व वरिष्ठ भीम आर्मी संघटनेच्या वतीने ही मागणी 5-6 वर्षापासून करण्यात आली असून, त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, महिला प्रमुख रंजनाताई जाधव, जिल्हा संघटक अशोक पाडमुख, वरिष्ठ मार्गदर्शक अरूण मगर, वरिष्ठ नेता अशोक जाधव, शहरप्रमुख अशोक झिने, तालुकाध्यक्ष सुनिल पाडमुख, एम.यु. पठाण, करण मोरे, सुनिता मगरे, गौरख कदम यांची नावे आहे.