जालना जिल्हा

जालना शहराच्या विकासासाठी ज्या मार्गाने मदत मिळेल ती घेतली पाहिजे-पालकमंत्री टोपे

जालना (प्रतिनिधी) : विकासाची कामं करतांना कधीच राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. जालना शहराच्या विकासासाठी ज्या- ज्या मार्गाने मदत मिळेल. ती घेतली पाहिजे. विकास कामं करतांना राजकारण आडवे आले नाही तर शहराचा चेहरा- मोहरा  बदलण्यासाठी वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे बोलतांना केले. राज्य शासनातर्फे मिळालेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीतून जालना नगर पालिकेमार्फत आज शनिवारी शहरातील चित्रकुट ते विवेकानंद हॉस्पीटल, राजस्थान स्वीट मार्ट ते जुना मोंढा, बुंदेले चौक ते फिल्टर बेट या तीन प्रमुख रस्त्यांच्या सिमेंटीकरण कामांचा शुभारंभ पालकमंंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.

images (60)
images (60)

त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, भाजपाचे गट नेते भास्करराव दानवे, सामाजिक कार्यकर्ते नारायण चाळगे, उद्योजक सी. एम. अग्रवाल, सय्यद रहीम, सुनील राठी, गणेश घुगे, महेंद्र अकोलकर, शितलताई तनपूरे, संगिता पाजगे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना टोपे म्हणाले की, सिमेंटीकरणाची कामे ही खर्चिक असली तरी टिकाऊ आणि दर्जेदार असतात. रस्त्याच्या कामाचा दर्जा जर खराब असेल तर त्याचा त्रास जनतेला होतो. जालना शहराचा विकास ही आपली सर्वांची बांधिलकी असून या कामात आपण तसूभरही मागे हटणार नाहीत, असे सांगून शहरातील कचर्‍याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने होण्यासाठी घनकचरा प्रकल्प कार्यान्वीत होण्याची अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली. विज, पाणी, सडक, स्वच्छता ही कामे प्राधान्याने करण्याची गरज असल्याचे सांगत विकास कामं करतांना सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना देखील झुकतं माप दिलं पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री टोपे यांनी आ. कैलास गोरंट्याल यांच्याकडे कटाक्ष टाकत व्यक्त केली.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना शहरातील विकास कामांना विशेष बाब म्हणून लवकरच भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत शहराच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या – ज्या योजना राबवता येईल त्या राबवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला देऊन चांगले आणि वाईट काम करणारे कोण ? हे पारखूनच शहरातील जनता नगर पालिकेच्या सत्तेची सूत्र सोपवतील, असा विश्‍वास पालकमंत्री टोपे यांनी शेवटी व्यक्त केला.  गेल्या सहा महिन्यात जालना शहरात सुमारे तीस कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. ही सर्व कामे प्रगतीपथावर असून शहरातील ४७५ कि. मी. रस्त्यापैकी प्रमुख व अंतर्गत रस्ते मिळून गेल्या पाच वर्षात तब्बल  ३२५ कि. मी. इतक्या रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत, असा दावा आ. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून केला आहे.

ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असून अद्याप पंधरा दिवसाचा कार्यकाळ हातात आहे. या पंधरा दिवसात विकासाची अनेक कामे मार्गी लावू, असा विश्‍वास आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केला. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची इमारत बांधून आता चाळीस वर्षे पूर्ण झाली असून दुरुस्ती करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे नाट्यगृहाची नवीन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडे जालना पालिकेने १६ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. नुतन वसाहत रस्त्यासह शहरातील पाच ते सहा प्रमुख रस्त्यांच्या सिमेंटीकरणाच्या कामासाठी देखील ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून या कामांना देखील लवकरच सुरुवात करणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!