शहरातील जनतेला आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करणार :सौ. गोरंट्याल
जालना:प्रतिनिधी
जालना शहरातील जनतेला आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन प्रयत्न आहे. शहरात उभारण्यात आलेले सर्व जलकुंभ, जलवाहिणीची टेस्टींग केली जात असून ही प्रक्रिया पुर्ण होताच आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी येथे बोलतांना दिली. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात शहरातील सर्वच प्रभागात विकासाची दर्जेदार कामे केली आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह लाईट, स्वच्छता आदी प्रश्न मार्गी लागले आहे.
जालना नगर पालिकेच्या आगामी काळात होणार असलेल्या निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा आपला प्रयत्न आहे. जागा वाटपात योग्य तडजोड झाली तर आघाडी करून नाही तर काँग्रेस पक्ष ही निवडणुक स्वबळावर लढवून किमान साठ जागेवर विजय मिळेल असा दावा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी आज येथे बोलतांना केला. आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे 3 कोटी 38 लक्ष रूपये खर्चुन विविध प्रभागात करण्यात येत असलेल्या 20 विकास कामांचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आ. गोरंट्याल यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, युवानेते अक्षय गोरंट्याल, न. प. गटनेते गणेश राऊत, नगरसेवक महाविर ढक्का, विजय चौधरी, रमेश गौरक्षक, श्रावण भुरेवाल, जगदिश भरतीया, विनोद यादव, हरिष देवावाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरंट्याल यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या 26 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचे सांगुन गेल्या पाच वर्षात आपण सर्वजन सोबत राहीले आणि चांगले काम केल्याबद्दल नगरसेवकांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले की, सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात विकासाची किमान 70 टक्के कामे झाली आहे. वैशिष्ट्यपुर्ण योजना, जिल्हा नियोजन समिती आमदार फंड व इतर योजनांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रूपयांचा निधी खर्च करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण केला आहे. काल शनिवारी शहरातील 5 प्रमुख रस्त्यांच्या सिमेंटीकरणाच्या कामाला सुरूवात करण्यात आली असून नुतन वसाहत, बडी सडक, सदर बाजार आणि अन्य रस्त्यांच्या कामासाठी दहा कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून प्राप्त होणार असून सदर कामांना देखील लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याचे सांगुन आ. गोरंट्याल म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. मात्र आघाडी होईल की नाही हे आज सांगता येत नाही. आघाडी झाली तर आघाडीसह निवडणुकीला सामोरे जाणार असून न झाल्यास स्वबळावर लढून किमान 60 जागांवर विजय मिळवायचा असा आपला प्रयत्न राहणार आहे. नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल आणि सर्व नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शहरात केलेल्या विकास कामांमुळे शरातील जनतेचा ओढा आणि आशिर्वाद असल्यामुळे काँग्रेस पक्षाला निश्चितपणे फळ मिळेल असा विश्वास आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभागाचे नगरसेवक जगदिश भरतीया यांनी प्रस्ताविक करून प्रभागात झालेल्या विकास कामांचा आढावा सादर केला. सुत्रसंचलन राम सावंत यांनी तर आभार श्रावण भुरेवाल यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमास नगरसेवक विनोद रत्नपारखे, वाजेद पठाण, सय्यद अजहर, जीवन सले, ॲड. राहुल हिवराळे, अरूण मगरे, आरेफ खान, किशोर सले, नजीब लोहार, अमजद पठाण, सौ. संगीता पाजगे, राजेंद्र वाघमारे, राज स्वामी, शेख शकील, बालाजी कोताकोडा, अशोक भगत, राहुल दाभाडे, राहुल खरात, संतोष काबलिये, सोनु सामलेटी, राधाकिशान दाभाडे, रवी जगदाळे, शेख लतीफ, विलास जगधने, गोपाल चित्राल, राहुल पवार, राहुल यादव, पुरूषोत्तम सिंगी, अशोक नावकर, अरूण घडलिंग, दत्ता घुले, कन्हैया श्रीमाळी, अभियंता सय्यद सऊद, इंजि. भद्रे, इंजि. कांबळे, एम. पी. पवार आदींची उपस्थिती होती.