जालना जिल्हा

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन


जालना दि. 7 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना येथे शनिवार, दि.11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रकरणे, महसुल प्रकरणे – फेरफार वाटप, भाडे वहिवाटीचा हक्क व इतर प्रकरणे, फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, बँकेचे दाखल पुर्व प्रकरणे, इन्सुरन्स कंपनीशी संबंधीत असलेली प्रकरणे जी तडजोड होण्यासारखी न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी व समोपचाराने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

images (60)
images (60)

तरी नागरिकांनी या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रकरणे समोपचाराने मिटवण्यासाठी उपस्थित राहुन या लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे

मुंबई, दि. 7 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत दि. 11 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!