जालना जिल्हा

जालना शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु.

  जालना दि. 8  :-  शैक्षणिक वर्ष 2021 -22 साठी जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, भोकरदन, बदनापुर, घनसावंगी  व संत रामदास मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना, भोकरदन, अंबड, मंठा असे एकुण 10 शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी  व विद्यार्थ्यीनींसाठी  मोफत प्रवेश सुरु झाले असुन  मागासवर्गीय गरजु व वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

images (60)
images (60)

    इयत्ता 8 वी पासून पुढील वर्ग सुरु झाले असल्याने, मागासवर्गीय मुलां- मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणा-या जागेवर प्रवेश  प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकृती  करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यालये व महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचे अर्ज विनामुल्य प्राप्त करुन  घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतिगृहातील गृहपाल व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जालना या कार्यालयाशी  02482- 225172 संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!