जालना जिल्हयासाठी खो-खो या खेळाच्या केंद्राकरिता मान्यता
खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्रास विभागीय क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे यांची भेट
जालना दि. 8 :- केंद्रशासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत खेलो इंडिया या योजनेमधून देशातील विविध जिल्हयामध्ये 1 हजार खेलो इंडिया सेंटर पुढील 4 वर्षामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे.
आयुक्त (खेलो इंडिया) यांना सादर केलेल्या प्रस्तावातील महाराष्ट्रातील प्रति जिल्हा एक खेळ याप्रमाणे खेलो इंडिया सेंटरसाठी मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयासाठी खो-खो या खेळाच्या केंद्राकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.
जालना जिल्हयातील खेलो इंडिया केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी घेऊन 12 वर्षाआतील 15 मुले, 15 मुली व इतर 10 खेळाडू असे एकुण 40 खेळाडू नियमीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे खो-खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.
खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्रास आज दि. 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे यांनी भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथील खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्रातून उत्कृष्ट़ प्रकारे खेळाडू घडतील अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथील चंद्रशेखर घुगे, क्रीडा अधिकारी, स्वप्नील तांगडे, सचिन पुरी, क्रीडा मार्गदर्शक, महमंद शेख, संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक, नवनाथ गायकवाड सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक सह खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.