जालना जिल्हा

जालना:राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पशुसंवर्धनाव्दारे उद्योजकता व कौशल्य विकासावरआधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगारांनी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

images (60)
images (60)

     जालना दि. 24 :–  ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवक तसेच ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकऱ्यांच्या  उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाच्या विशेष अर्थसहाय्याने विविध योजना राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने  सन २०२१-२२ या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नवीन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजूरी प्रदान केली आहे. इच्छुकांनी या अभियानातंर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.

सुधारीत राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यवसायीक, स्वयं-सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम-८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, सहकारी दूध उत्पादक संस्था, सह जोखीम गट (जेएलपी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट-अप ग्रुप इ. घेऊ शकतात. या योजनेतंर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखादय व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती करणे तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वैयक्तिक व समुह गट व्यवसायीकांचा आर्थिक दर्जा उंचावून ग्रामीण क्षेत्रामधील रोजगार निर्मिती करण्यासाठी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनांच्या लाभासाठी अर्ज प्रस्ताव मागविण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त आहेत. ऑनलाइन प्रणालीनुसार प्राप्त प्रस्तावाची राज्यस्तरीय कमिटी मार्फत छाननी होणार असून त्यापैकी पात्र प्रस्ताव सीडबी (SIDBI) कडे आर्थिक सहाय्य तपासणीसाठी पाठविले जातील. केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर लाभधारकास अंतिम मंजूरी दिली जाईल. पात्र लाभधारकास अनुदानाची रक्कम तीन टप्प्यात दिली जाणार असून पहिला टप्पा प्रत्यक्ष कामाच्या सुरूवातीस, दूसरा टप्पा काम अर्धे पूर्ण झाल्यानंतर व तिसरा टप्पा कामाच्या अंतिम पहाणी अहवालानंतर दिला जाईल. लाभधारकाकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक असून जमीन खरेदीकरीता कोणतेही अनुदान दिल्या जाणार नाही.

            योजनेअंर्तगत लाभ मिळण्याकरीता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून पुढीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पुरावा (मतदान ओळखपत्र, वीज देयकाची प्रत) छायाचित्र, अलीकडच्या काळातील बँकेचा रद्द केलेला चेक तर अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ, आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमीनीचे कागदपत्र, जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास जोडावे. अर्ज सादर करताना नोंद केलेला मोबाइल क्रमांक लाभधारकाने बदलू नये.

            योजनांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ग्रामीण कुकुट पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास, ग्रामीण शेळी-मेंढी पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकास, विविध शेळी मेंढीच्या जातीतील अनुवंशिकता सुधार, विभागीय शेळी व मेंढीच्या वीर्यमात्रा निर्मितीची स्थापना, राज्य शेळी –मेंढी वीर्य पेढीची स्थापना, शेळी  मेंढी मधील कृत्रिम रेतन वृद्धिगंत करणे, शेळी मेंढीच्या वंश सुधारण्याकरीता विदेशी अनुवंशिक साधनसामुग्री आयात करणे, वराह पालानाद्वारे उद्योजगता विकास, वराह वीर्य प्रयोगशाळेची स्थापना, वराह वंश सुधारणाकरीता विदेशी अनुवंशिक साधनसामुग्री आयात करणे, गुणवत्ता पुर्ण वैरण बियाणे उत्पादनाकरीता अनुदान, पशुखाद्य व वैरण उद्योजगता विकास.

             सदर योजनांच्या सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इ. महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळ– https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेत स्थळ– https://www.nlm.udyamimitra.in  यावर उपलब्ध आहे. योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जालना, जिल्हा / तालुका पशुवैद्यकीय सर्व-चिकित्सालाये, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जालना अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था केंद्रावर संपर्क साधावा, असे अवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!