जालना जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे शेतवस्तीवर दरोडा; कुऱ्हाड अन् शस्त्राने हल्ला..
जालना, 25 डिसेंबर : जालन्यातील वस्तीवर सशस्त्र दरोडा (robbery) पडला आहे. दरोडेखोरांनी जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा रोडवरील पिंपळखुंटा शेतवस्तीवर दरोडा टाकला आहे. महिलांवर हल्ला करुन दरोडेखोरांनी दागिने (Gold ornaments) आणि रोख रक्कम पळवली (Cash looted). दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी (3 woman injured) झाल्या आहेत.
शेजारील घरांच्या कड्या लावून दरोडा
या दरोड्यात दरोडेखोरांनी शेजारील घराच्या दरवाजाच्या कड्या लावून महिलांना कुऱ्हाड, शस्त्राने वार करून जब्बर मारहाण केली. यानंतर महिलांच्या अंगावर असलेले सोन्या – चांदीचे दागिने हिसकावत, घरातील लोखंडी पेटीत तोडून पेटीतील 15 हजार रोख, सोन्याची अंगठी असे एकूण 4 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
या दरोड्यात सखुबाई रामदास खोबरे, रंजना संजय गाडेकर,लता रमेश गाडेकर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना जालन्यातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.