जालना जिल्हा

नगरसेविका संध्या देठे यांचे आरोप बिनबुडाचे ः सौ. स्वाती राहुल पवार


जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील वार्ड क्र. 23 मध्ये झालेले विकास कामे आणि सिमेंट रस्त्याबाबत नगरसेविका संध्या देठे यांनी दि. 22 डिसेंबर बुधवार रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. सदर प्रकरणी स्थानिक पातळीवर केलेल्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने प्रजासत्तक दिनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप सौ. स्वाती राहुल पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

images (60)
images (60)


या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येताच नगरसेवीका सौ. संध्या देठे यांना झालेले विकास कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले. मागील दहा वर्षापासून देठे ह्या नगरसेविका होत्या. या काळात मधुबन कॉलनीत कुठलेही विकास कामे न करता स्वतःच्या घराच्या विकासाकडेच त्यांनी लक्ष दिले. लोकांचे लक्ष विचलित करून सहानुभूती मिळविण्याकरीता वाट्टेल ते आरोप आणि तक्रारी करत आहे.

सौ. देठे ह्या नगरसेविका असतांना अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या घराचे बांधकाम विनापरवाना केले. त्यांचे पती संजय देठे लेखापरीक्षक वर्ग-1 शाखा, जालना येथे लिपिक पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा गैरवापर करत राजकीय पक्षाचे सभासद झाले. संजय देठे हे स्वतःला नगरसेवक असल्याचे भासवून स्वतःच कामे करतात. स्वतःचा गैरप्रकार उघडकीस होवु नये म्हणुन खोटेनाटे आरोप करण्याचे काम सौ. देठे करीत आहे. सौ. देठे यांना लोकप्रतिनिधींनी केलेले विकास कामे सहन होत नसल्याने खोटेनेटे आणि बिनबुकाचे  आरोप करत आहे. जे की त्यात काहीच तथ्य नाही. सौ. देठे यांनी स्वतःच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात काय विकास केला. नगर पालिकेच्या सभागृहात प्रभागातील कुठले प्रश्‍न मार्गी लावले.

तसेच संजय देठे शासकीय सेवेत असतांना सभासद व नगरसेवक म्हणून कोणत्या अधिकाराने काम पाहत होते याची उत्तरे सौ. संध्या देठे यांनी द्यावे. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार देठे यांनी पोलीसात दिली. हे कितपत खरे कारण नगरसेवक कुठेही जावो लोक सोबत असतातच व क्रीडा संकुलनात नगरसेविका संध्या देठे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याबरोबर उपस्थित असलेले व इतर लोकांना पटत नाही हे फार मोठे कोडे असल्याचे सौ. स्वाती राहुल पवार यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!