जालना जिल्हा

10 रुपयांचे नाणे चलनात स्वीकारावे,जिल्हा अग्रणी बँक अधिका-यांचे आवाहन

    जालना दि.27(न्यूज जालना) :-  जालना जिल्ह्यात काही ठिकाणी 10 रुपयांचे चलनी नाणे व्यवहारात स्वीकारणे बंद करण्यात आल्याच्या  तक्रारी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार 10 रुपयांची नाणी ही वैध चलन आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की 10 रुपयांचे चलनी नाणे व्यवहारातुन बंद झाल्याबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व सहकारी बँका तसेच नागरीकांनी 10 रुपयांची चलनी नाणी व्यवहारात स्वीकारावीत असे  जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सांगितले आहे.   

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!