परतूर तालुका

आंबेडकर नगर परतुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न

images (60)
images (60)

दिपक हिवाळे/ परतूर न्युज नेटवर्क

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परतुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सभा आंबेडकर नगर मित्र मंडळ तर्फे आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल खरात ,ॲड महेंद्र वेडेकर,प्रा.सिध्दार्थ पानवाले,ॲड माजीद पटेल तर अध्यक्षस्थानी पशुवैद्यकीय माजी नगराध्यक्ष दादाराव पाडेवार,माजी नगरसेविका रमाबाई पाडेवार व नगरसेविका प्रतिभा बंड उपस्थित होते तसेच. प्रा डॉ.रवी प्रधान सर यांचा  समाजबांधवांतर्फे पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी  मान्यवरांनी आपापल्या संबोधनात भिमा कोरेगावचा इतिहास आणि सद्य समाजस्थीती यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय बौध्द महासभा संस्कार विभाग तालुका उपाध्यक्ष हेमंत पहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल याने केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आंबेडकर नगर मित्र मंडळच्या सदस्यांनी तसेच महिला उपासिका यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!