शिवणगाव शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी रामेश्वर तौर तर उपाध्यक्ष उमेश तौर यांची निवड
घनसावंगी प्रतिनिधी / नितीनराजे तौरपाटील
घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय शिक्षण समितीची निवड आज शनिवार (ता.०८) रोजी करण्यात आली.
यावेळी शालेय समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर दगडुबा तौर तर उपाध्यक्षपदी उमेश वसंतराव तौर यांची निवड करण्यात आली,ही निवड प्रक्रिया प्रत्येक वर्गातुन एक पालक प्रतिनिधी घेऊन नंतर सदर प्रतिनिधीतुन मतदान घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड केली गेली यामध्ये सदस्य पदी रंजित साबळे,मोहन तौर,भाऊराव तौर, चंद्रवीलास तौर,बाळासाहेब तौर,मोहन मात्रे,गोविंद तौर,भास्कर मोरे, किरण मोरे,मुख्याध्यापक श्रीकृष्ण तौर, शिक्षक प्रतिनिधी हेमराज रमधम यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमासाठी सरपंच अशोक तौर,पत्रकार नितीन तौर,लहुराव तौर,प्रकाश तौर,पृथ्विराज तौर,विठ्ठल तौर,सचिन तौर सहशिक्षक युवराज डावकर, चोपडे सर,राऊत सर हे उपस्थित होते