भोकरदन शहरात विनामास्क नागरिकांवर पोलीसाची दंडात्मक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
भोकरदन / मधुकर सहाने, दि. 12 :- भोकरदन शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळलेल्या नागरिकांवर आज पोलीस विभागामार्फत मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असुन या परिस्थितीमध्ये कोरोना संसर्ग वाढु नये यादृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर व सामाजिक अंतराचे पालन करणेही तेवढेच महत्वाचे आहे. जालना जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरता प्रत्येकाने कोव्हीड नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले असुन विनामास्क फिरणाऱ्या तसेच गर्दी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. आज भोकरदन येथे मुख्य चौकात पोलीसांनी विनामास्क आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले.