राष्ट्रमाता माँ.जिजाऊ जयंती व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा संपन्न
जालना प्रतिनिधी / एकनाथ जाधव
कुं. पिंपळगाव येथे राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ जयंती आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे आरोग्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वाद-विवाद व वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मा.भागवत अन्ना सोळंके,(ता.अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना) कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंत जवळकर व प्रमुख पाहुणे म्हणून विनोद भगत, यांची उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय कंटूले यांच्या कल्पतेतून ह्या तालुका स्तरीय वाद-विवाद व वकृत्व स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील तीर्थपुरी राणिउंचेगाव,पिंपरखेड,कुं. पिंपळगाव परिसरातील विविध शाळेनीं यावेळी सहभाग नोंदविला- या कार्यक्रमाची सुरुवात मा.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अशा स्तुत्य उपकमातूनच समाजाची दिशा ठरते – भागवत अण्णा सोळंके
या कार्यक्रमास शुभेच्छा देताना अशा स्तुत्य उपक्रम समाजाची दिशा ठरत असतात असे मत यावेळी भागवत अन्ना सोळंके यांनी सांगितले तर आपल्या भागातील प्रत्येक घटकाप्रती असलेली राजेश भैय्या टोपे यांची तळमळ हीच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रेरणा देऊन गेली असे प्रास्ताविकेत धनंजय कंटुले यांनी सांगितले
यावेळी निकाल घोषित करताना विनोद भगत यांनी सांगितले की निकोप व सर्वसमावेशक बाबींचा समावेश असल्यास स्पर्धेचा आणि विद्यार्थ्यांचा दर्जा वाढतो व याच अनुषंगाने या परिसराचा वैचारिक दर्जा सुद्धा नकळत उंचावतो यावेळी निकाल घोषित करण्यात आल.पहिल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेत ईयत्ता १ली ते ४थी
प्रथम क्रमांक सुशांत शंकर कंटुले (शांतिनिकेतन स्कूल ऑफ स्कॉलर्स कुं.पिंपळगाव) द्वितीय क्रमांक सोहम भाऊसाहेब बहिर( जि.प.प्रा.शाळा शिवाजी नगर राणी उचेगाव )व शंतनू बालासाहेब सोनवणे जि.प.प्रा.शाळा नागोबाची वाडी यांना विभागून देण्यात आला.
(द्वितीय गट वक्तृत्वस्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी)प्रथम क्रमांक हाशर्वरी भास्मारे (मत्स्योदरी वि.नाथनगर) हीने मिळविला तर द्वीतीय क्रमांक श्रद्धा लक्ष्मण गोरे(एस पी पाटील इंग्लिश स्कूल तीर्थपुरी) वादविवाद स्पर्धा-सांघीक प्रथम क्रमांक वैष्नवी भारत बहीर प्रतिक्षा पद्माकर तौर मत्स्योदरी कन्या शाळा कुं. पिंपळगाव
द्वितीय क्रमांक साघीक तुलशी सतीश नागरगोजे व गायत्री तुकाराम रक्ताटे यांनी मिळवले वैयक्तिक प्रथम मध्ये वादविवाद स्पर्धेत
गायत्री तुकाराम रक्ताटे हीने मिळवले
स्पर्धेचा गुणत्क्ता आराखडा अशोक काकडे यानीं तर यावेळी परीक्षक म्हणून विनोद भगत ,यावेळी शिक्षक अशोक काकडे ,कांगुणे दुस्यम , बढे ,बहिर , वानखेडे ,धरणे यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांची उपस्थिती होती
यावेळी अध्यक्षीय भाषणात वसंत जवळकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अशा स्तुत्य उपक्रमास सदैव सहकार्य राहील असे सांगितले
यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिषेक कदम प्रकाश घेने ,वानखेडे ,पठाण मॅडम,राऊत , निचळ ,तडवी ,जोगदंड ,भोज डावकर यांची उपस्थिती व सहकार्य होते यावेळी हनुमान शिंदे यांनी विजेत्या विजेत्यांना बक्षीस नामदार राजेश भैय्या टोपे यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल असे सांगून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले