जालना क्राईम
जालना शहरात तरुणाचा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून
जालना/ प्रतिनिधी
जुना जालना शहरातील डबलजीन भागातील मोकळ्या जागेत भरत अशोक मुजमुले (वय 24) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक, देविदास सोनवळे आदींसह पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला होता हा प्रकार रात्रीतूनच घडला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाच्या पोटावर धारदार शस्त्राने सात ते आठ वार करण्यात आलेले आहेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.