कुंभार पिंपळगाव:युवतींनी अबला म्हणून नाही तर सबला म्हणून वावरावे- श्रेया चंदन
अभाविपच्या मिशन साहसींने दिले विद्यार्थिनींना धडे
या उपक्रमातून विद्यार्थिनीमध्ये धैर्य निर्माण व्हावे-विक्रम राऊत
कुंभार पिंपळगाव/ एकनाथ जाधव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,शाखा कुंभार पिंपळगाव आणि कराटे डु असोसिएशन ऑफ जालना. यांच्या संयुक्त विद्यमानाने वतीने स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल कु. पिंपळगाव येथे मिशन साहसी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी
म्हणून श्रेया चंदन अभाविप प्रदेश कार्यसमिती सदस्य,अंकिता कासट जिल्हा सहसंयोजक विक्रम राऊत उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कराटे प्रशिक्षक म्हणून गणेश शिंदे जालना पुनम बुरसे गौरी आनंदे स्नेहा भोपाळ आदित्य आनंदे यांनी विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे दिले. या प्रशिक्षणासाठी सर्व महाविद्यालयातून 155 विद्यार्थीनी उपस्थित होत्या. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता त्यांनी स्वतः चे रक्षण स्वतः करावे आणि ते हे करू शकतात हे त्यांच्या मनावर बिंबवावे हा मिशन साहसी या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.
परिसरातील सरस्वती भुवन प्रशाला, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, मत्स्योदरी महाविद्यालय,मत्स्योदरी कन्या विद्यालय शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, शिवाजी विद्यालय राजाटाकळी या शाळेतील विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकिता कासट शरद चाफाकानडे राम राऊत अभिजीत तांगडे अभिषेक तांगडे विक्रम राऊत विशाल काळे राहुल पवार किशोर मोरे तसेच विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.