जालना क्राईम
चोरीची मोटारसायकल घेऊन बेफाम निघालेल्या चोरट्याचा अपघात
मंठा प्रतिनिधी
मंठा तालुक्यातील वाघाडा येथील समाधान भानुदास कांबळे (वय 22) हा तरुण आज दुपारी मोटारसायकलवरून औरंगाबाद येथून जालना इथे आला होता. औरंगाबाद चौफुलीजवळ त्याला एका इसमाने लिफ्ट मागून बसस्टँडला सोडण्याची विनंती केली. त्याने त्या तरुणास बस स्टँडला सोडले व लघुशंकेसाठी दुचाकीला चावी तशीच ठेऊन बाजूला गेला. त्यादरम्यान, ज्या व्यक्तीला त्याने लिफ्ट दिली त्यानेच त्याची मोटारसायकल घेऊन धूम ठोकली होती.पण जालना-अंबड चौफुली दरम्यान बायपासला सफारी धब्याजवळ त्याचा अपघात झाल्यावर लोकांनी पोलिसांना माहिती दिली व कदिम पोलीस त्याठिकाणी गेल्यावर गाडीच्या डिकीमध्ये असलेल्या मोबाईलवर कॉल केल्यावर गाडी चोरीला गेल्या बाबत माहिती समोर आली. तेव्हा गाडी चोरीबाबतचे बिंग फुटले.