घनसावंगी तालुका

नामविस्तार हा संघर्षाचा राहिलेला आहे- प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे

प्रतिनिधी घनसावंगी.

images (60)
images (60)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी येथे काल ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. कन्नुलाल विटोंरे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते “विद्यापीठ नामविस्तार दिन आणि आपण “या विषयावर ती आपले विचार मांडले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते .यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विटोरे यांनी सांगितले की” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठवाड्यासाठी शिक्षण विषयक त्यांची तळमळ होती .

आणि त्या अनुषंगाने त्यांनी 1950 मिलिंद महाविद्यालय आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. तसेच या ठिकाणी एखादे विद्यापीठ असावे असेही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. 1958 स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेबांचे नाव असावे यासाठी मोठा लढा देण्यात आला. तब्बल 17 वर्ष लढा देण्यात आल्यानंतर व बऱ्याच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. हा लढा अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा होता.मोठ्या संघर्षानंतर 14 जानेवारी 1994 साली मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले.आज 425 पेक्षा जास्त संलग्नित महाविद्यालये आणि 40 पेक्षा जास्त विभागाच्या अंतर्गत हे विद्यापीठ देश व देशाची जोडले गेले आहे. येथे दर्जेदार शिक्षण यामधून दर्जेदार कौशल्य शिक्षण दिले जाते. तसेच मराठवाड्याच्या विकासामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अत्यंत मोठी असे योगदान आहे. विद्यार्थ्यांना नामविस्ताराचा हा इतिहास माहीत असला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे असे ते म्हणाले.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शना मध्ये प्राचार्य चंद्रसिंग कोठावळे यांनी सांगितले की “विद्यार्थ्यांनी इतिहासातून बोध घेतला पाहिजे इतिहास आम्हाला प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्याची कामाना करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इतिहास संघर्षाचा आणि प्रेरणेचा आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही विद्यापीठ स्वाभिमानाचे आणि हक्काचे व्यासपीठ आहे. मराठवाड्याच्या विकासामध्ये विद्यापीठाचे अतुलनीय योगदान राहिलेले आहे. यात दर्जेदार उच्च शिक्षणासह उच्च दर्जाचे संशोधन कार्य होत आहे.

विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी. असेही ते यावेळी म्हणाले.प्रास्ताविक प्राध्यापक उदय पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर खोजे यांनी केले तर आभार डॉ.ऋषी बाबा शिंदे यांनी मानले.यावेळी आभासी पटलावर ऑनलाइन पद्धतीने मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!