तलवारीने केप कापणे आले अंगलट ;पोलिसांच्या कारवाईत सहा तलवारी एक गावठी कट्टा जप्त
जालना : तालुक्यातील कडवंची आणि दरेगाव येथून पोलिसांनी सहा तलवारी आणि एक गावठी कट्टा जप्त केला .ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली असून , या प्रकरणी सहा जणांविरुद्ध अवैध शस्त्र गुन्हा दाखल बाळगल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला आहे .
सविस्तर वृत्त असे की,जालना तालुक्यातील कडवंची येथील कृष्णा सरोदे याचा शुक्रवार रात्री वाढदिवस होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्याने तलवारीचा वापर केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांना मिळाली होती.
या माहितीनुसार राजगुरू यांनी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचे एक पथक तयार करून सायंकाळी कडवंची येथे कृष्णा सरोदे याच्या घरावर धाड टाकली. कृष्णा सरोदे याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन तलवारी मिळाल्या. तसेच त्याचा मित्र विजय मोहिते याच्या घरात एक तलवार मिळून आली.
या दोघांची चौकशी केली असता त्यांनी या तलवारी दरेगाव येथील गोपाल गिरी याच्याकडून विकत आल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने गोपाल गिरी याच्या दरेगाव येथील घरावर धाड टाकून झडती घेतली असता त्याच्याजवळ एक मोठी तलवार, एक लहान तलवार आणि एक छेऱ्याची पिस्तूल आढळून आली.
तसेच दरेगाव येथील यमाजी बकाल याच्याही घराची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक तलवार मिळून आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी नीरज राजगुरू यांच्यासह तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस अंमलदार कैलास खार्डे, सुभाष पवार, धनाजी कावळे, दीपक घुगे, जगन्नाथ जाधव, रामेश्वर पवार, अनिल काळे, तालुका पोलीस ठाण्याचे वसंत धस, कृष्णा भडांगे आदींनी ही कामगिरी केली आहे.