जालना क्राईम

दोघेही पळून गेले … अन् उतरण्याच्या आधीच पोलिसांनी घेरले

जालना : एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन मिळाले अन् पोलिसांनी ट्रॅव्हल्समधून उतरण्याच्या आधीच सोमवारी दोघांना घेरले . दोघांना ताब्यात घेऊन मुलीला वडिलांच्या स्वाधीन केले , तर मुलाची कोठडीत रवानगी करण्यात आली .

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील २५ वर्षे वय असणारा रा . भोगगाव असे त्या संशयिताचे नाव आहे . १४ जानेवारी रोजी सकाळी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्यादी गोंदी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती . या तक्रारीवरून गोंदी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली . ही मुलगी औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली . या माहितीवरून पोलिसांनी मोबाईलवरून लोकेशन काढले . दोघेही पुण्याच्या दिशेने जाताना दिसले . पोलिसांनी थेट पुणे गाठून येरवडा पोलिसांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!