पहा -जालना जिल्ह्यातील पाच नगर पंचायत निवडणूक निकाल जाहीर
जालना – जिल्ह्यातील 5 नगर पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे.जालन्यातील लक्षवेधी असलेल्या घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. घनसावंगी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला 10 तर तिर्थपुरी नगर पंचायतीत 11 जागा मिळाल्या आहे. जाफ्राबाद नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 6 जागेवर विजय मिळाला असून अपक्षांना 4 तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.
या निवडणुकीत भाजपने 9 तर राष्ट्रवादीने 5 जागांवर विजय मिळवला आहे. बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांनी वर्चस्व मिळवलं असून शिवसेनेला एकही जागा या नगर पंचायतीत मिळाली नाही.त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
मंठा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालंअसून शिवसेनेचे12 उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले आहे. मंठा नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धक्का बसला आहे. मंठा नगर पंचायत पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.तर बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे.
हे देखील वाचा –

पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार
जालना – घनसावंगी
भाजप 0
शिवसेना 6
राष्ट्रवादी 10
काँग्रेस 0
ईतर 0
जालना – मंठा
भाजप 2
शिवसेना 12
राष्ट्रवादी 1
काँग्रेस 2
ईतर 0
जालना -जाफ्राबाद
भाजप 1
शिवसेना 0
राष्ट्रवादी 6
काँग्रेस 6
ईतर 4
जालना – तिर्थपुरी
भाजप-2
शिवसेना-3
राष्ट्रवादी-11
काँग्रेस-1
ईतर-0
जालना – बदनापूर
भाजप-9
शिवसेना -0
राष्ट्रवादी-5
काँग्रेस-1
ईतर-2ं