जालना शहरात सव्वालाखाच्या १० सायकलीसह तीन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात
जालना:-
वकिलाच्या सायकल चोरीचा तपास करतांना पोलिसांना सापडल्या चोरीच्या सायकली
शहरातील वकील महेश सिताराम धन्नावत यांची डेकथलॉन कंपनीची 25 हजाराची सायकल दोन दिवसांपूर्वी घरासमोरून चोरी गेली होती.
वकीलाचीच सायकल चोरी गेल्यामुळे सदर बाजार पोलीस ठाण्याची यंत्रणा सायकल चोराच्या शोधासाठी झपाट्याने कामाला लागली होती.
दरम्यान, मोदीखाना येथे काही अल्पवयीन मुले वेगवेगळया कंपनीच्या सायकली आणुन कमी किमतीत विक्री करत आहेत, अशी माहीती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सूत्रे हलवून संबंधीत संशयीत मुलांना ताब्यात घेतले व चौकशीत त्यांनी सदर वकिलाची व अन्य काही सायकली चोरी केल्याची कबुली दिली. अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून 10 सायकल एकूण 1,30,000 रुपये किमतीच्या जप्त केल्या असून तीन संशयीत विधिसंघर्ष ग्रस्त बालकाना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख,अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. ज्ञानेश्वर पायघन, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद रंगे , सुभाष पवार, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, रामेश्वर जाधव , धनाजी कावळे, दिपक घुगे, अनिल काळे, मनोहर भुतेकर यांनी केली आहे.