जालना जिल्हा
12 आमदारांचे निलंबन हे सूडबुद्धीनेच; आ. कुचे यांचा आघाडी सरकारवर आरोप
जालना /प्रतिनिधी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्या आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. १२ आमदारांच्या निलंबनाच्या रद्द करण्यात आलेल्या निर्णयानंतर जालन्यातील बदनापूर येथील भाजपचे आ. नारायण कुचे यांनी आघाडी सरकारने हे निलंबन सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त केले आहे.
आ. नारायण कुचे यांनी या निर्णयानंतर बदनापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला.
आ. कुचे यांच्या समर्थकांनी यावेळी फटाक्यांची अतिषबाजी करत निलंबन करणाऱ्या आघाडी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.