जालना जिल्हा

जालना जिल्हा नियोजन समितीमध्ये या सदस्यांची वर्णी

जालना- जिल्ह्याच्या विकासासाठी अंदाजपत्रक तयार करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समिती ( dpdc ) कार्यरत असते . पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधी नियोजन समितीमध्ये ठराव घेऊन खर्च करावा लागतो . त्यानुसार नियोजन समितीच्या वारंवार बैठका होत असतात . अशा या जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित आणि अनुभवी व्यक्तींची निवड केल्या जाते . त्यानुसार जालना जिल्हा नियोजन समितीवर दोन विशेष निमंत्रितांची तर 9 नियोजन समितीचा अनुभव असलेल्यांची 9 सदस्यांचे निवड करण्यात आली आहे .

images (60)
images (60)

राज्याचे उपसचिव सं . हं . धुरी यांनी काल हे आदेश जारी केले . नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून एक विधिमंडळ सदस्य आणि एक खासदार यांचीही नियुक्ती केली जाते . त्यानुसार विशेष निमंत्रितामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव तर विधान मंडळाचे सदस्य राजेश राठोड यांची निवड केली आहे . उर्वरित नियुक्त्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा अनुभव असलेल्या , सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या नऊ व्यक्तींचा समावेश असतो . या 9 व्यक्ती पुढील प्रमाणे . १ ) माजी आमदार चंद्रकांत दानवे , भोकरदन २ ) रवींद्र तौर , लिंबी , तालुका घनसावंगी . ३ ) जयंत वाकुळणीकर , वाकुळणी , तालुका बदनापुर . ४ ) बळीराम कडपे , आष्टी तालुका , परतुर . ५ ) जयाजी किसनराव देशमुख , नसडगाव , तालुका जालना , ६ ) राजेभाऊ देशमुख , भोकरदन . ७ ) माजी आ . अरविंदराव चव्हाण , जालना . तसेच शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख ८ ) भास्कर आंबेकर , जालना ९ ) आसाराम बोराडे यांचाही यामध्ये समावेश आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!