जालना क्राईम

जालना:क्राइम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून महिलेचे सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लुटले

जालना प्रतिनिधी
नवीन जालना शहरात भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे खळबळ
जिल्ह्यात क्राईम ब्रँचच्या बनावट पोलिसांनी पुन्हा डोके वर काढले आहे

images (60)
images (60)

जालना शहरातील म्हाडा कॉलनी (मंठा चौक) भागातील श्रीमती लीला मदनलाल सोनी (वय 68) या आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी स्कुटीवरून शिवाजी महाराज पुतळ्याकडून फुले मार्केटकडे जात होत्या.
त्यांना अमर छाया टॉकीज जवळ दोन भामट्यांनी आडवे आम्ही क्राईम बघायचे पोलिस आहोत पुढे तपासणी सुरू आहे, असे सांगून तुमच्या गाडीची डिक्की तपासू द्या असे सांगितले.
त्यादरम्यान भामट्यांनी श्रीमती सोनी यांच्या गळ्यातील, हातातील, बोटातील सुमारे 1लाख 17 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढण्यास सांगून, स्कुटीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले.

तेव्हड्यात भामट्यांनी हे दागिने डिक्कीतून दिशाभूल करून लांबविले.

या प्रकारानंतर श्रीमती सोनी यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ भताने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक उद्धवराव चव्हाण आदींसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!